महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती ,२ मंत्र्यांसह विद्यमान कार्याध्यक्षांना डच्चू

0
234

नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारीला आपल्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.नाना पटोले (Nana Patole)हे साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.आता काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र काँग्रेसची (Congress)नवी टीम जाहीर केली असून यामध्ये नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.पटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलीय.यामध्ये विद्यमान कार्याथ्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.

  • नाना पटोले यांनी 4 फेब्रुवारीला दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा
  • ते साकोली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत
  • आता त्यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली
  • पटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवळ