पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती 

0
32

पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली झाली. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा कालखंड पूर्ण झाल्याने हर्डीकर यांची बदली झाली आहे. आता याठिकाणी राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षी हर्डीकर यांचा तीन वर्षांचा कालखंड पूर्ण झाला होता मात्र कोरोनामुळे त्यांची बदली लांबणीवर पडली होती. त्यांनी कोरोनात चांगली कामगिरी पार पाडली आहे.
राजेश पाटील हे २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले अन  त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली होती यांनी आत्मचरित्रपर पुस्तक ‘ताई मी कलेक्टर होऊ’ याचे लेखन केले आहे.