सचिन वाझे प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल -अजित पवार

0
38

मुंबई: महाविकास आघाडी मध्ये बिघाड नसल्याचे सांगताना आज अजित पवार यांनी मनसुख हिरेन प्रकरण आणि  मुकेश अंबानी यांच्या घराजवळ गाडीत स्फोटकं सापडण्याप्रकरणी योग्य तो तपास सुरू आहे. तपासाअंती जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.तसेच सचिन वाझे प्रकरणी जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. त्यात कोणालाही पाठिशी घालण्याचे महाविकासआघाडी सरकारचे काहीही कारण नाही. सरकार तसं अजिबात होऊ करणार नाही शी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली