अर्जुन तेंडुलकर कोणत्या आयपीएल संघात दिसणार?

0
31
IPL TWITTER HANDLE
IPL TWITTER HANDLE

आयपीएल गव्हर्निंग कॉन्सिलने आयपीएल स्पर्धेच्या लिलावासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची निवड केली आहे. आयपीएलच्या पुढील हंगामासाठी 18 फेब्रुवारीला लिलाव होणार असून नवख्या खेळाडूंची नोंद करण्यात आली आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकराचा यात समावेश करण्यात आला असून त्याची बेस प्राईस 20 लाख रुपये इतकी आहे. लिलावासाठी 814 भारतीय तर 283 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.

लिलावासाठी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन आणि भारताच्या एस. श्रीसंथ यांचीही वर्णी लागली आहे. तर हरभजन सिंग, केदार जाधव, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोईन अली, सॅम बिलिंग्स, जेसन रॉय यांचा दोन कोटींच्या बेस प्राईससह समावेश करण्यात आला आहे.