अर्णब व्हॉट्सअॅप चॅटप्रकरण संसदेत गाजणार

0
34

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅटचा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशात आज गाजण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसदेत चर्चेसाठी प्रस्ताव सादर केला आहे. अर्णब यांचे व्हॉट्सअॅप चॅट राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा दावा त्यांनी प्रस्तावात केला आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामा यांचे बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यासोबत झालेला व्हॉट्सअॅप संवाद जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या संवादामध्ये अनेक आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत. फेब्रुवारी 2019मध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्याबाबतही आक्षेपार्ह विधान आहेत.

दुसरीकडे अर्णब आणि रिपब्लिक चॅनेलला वाचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.