बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणारे अटकेत

0
44

नामांकित ब्राँडच्या बनावट उत्पादनांची विक्री करुन ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे शाखेनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 24 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबईतील(Mumbai) मालाड पश्चिम येथील क्रिस्टल प्लाझामध्ये या मालाची सर्रासपणे विक्री केली जात होती. याबाबतची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. भावेश रमणीकभाई, तुषार शिगवण, ईश्वर अहीर, हरदीप राजदेव, दिनेश गेहलोत अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणारे अटकेत
  • कारवाईत 24 लाखांचा मुद्देमाल जप्त
  • प्रकरणात 5 आरोपींना अटक