आमदार किशोर जोरगेवारांनी संताप व्यक्त करताच गॅलरीतील आमदारांना मिळाला लॅपटाॅप

0
20

कोरोनामूळे अधिवेशनात सामूहिक अंतर राखल्या जावे यासाठी काही आमदारांना गॅररीत बसविण्यात आले आहे. मात्र या आमदारांना लॅपटाॅप दिल्या गेल्या नसल्याने सभागृहातील कामकाज पाहण्यास अडचण ेयेत होती. यावर काल चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनतर आज येथील सर्व आमदारांना लॅपटाॅप उपलब्ध करुन देण्यात आले.
मध्यतरी कमी झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत अचाणक वाढ झाली आहे. अशातच अर्थसंकल्पीय अधिवेशेन होत असल्याने सभागृहात कोरोना बाबतचे सर्व नियम पाळल्या जात आहे.

अधिवेशनाच्या दरम्यान सामूहिक अंतर पाळल्या जावे या करीता एका बेंचावर एका आमदारालाच बसविण्यात येत आहे. तर उर्वरीत आमदारांसाठी सभागृहातील गॅलरी येथील बेंचेस आरक्षीत करण्यात आले आहे. मात्र गॅलरीत बसणा-या आमदांकडे लॅपटाॅप न दिल्या गेल्याने सभागृहातील कामगाज पाहणे व ते समजने अवघड झाले होते. त्यामूळे काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकारावर असंतोष व्यक्त केला होता. याची दखल सभागृहाच्या वतीने घेण्यात आली असून आज पासून गॅलरीत बसणा-या सर्व आमदारांना लॅपटाॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.