आसाम सरकारचा निर्णय! स्प्रिंटर हिमा दासची DSP पदी नियुक्ती

0
30

आसाम सरकारने भारताचू तरूण धावपटू हिमा दासला डीएसपीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये श्रेणी -१ आणि श्रेणी -२ मधील खेळाडूंच्या नियुक्तीसाठी मंत्रिमंडळाने एकात्मिक क्रीडा धोरणात सुधारणा केली आहे. प्रवर्ग -२ मध्ये ऑलिम्पिक, आशियाई खेळ व राष्ट्रकुल स्पर्धेतील राज्य पदकविजेते नेमले जातील.केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनीही ट्विट करून हिमा दास यांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. रिजीजू यांनी याबद्दल सर्वानंद सोनोवाल यांचे आभार मानले आहेत.


photo: hima das