अमेरिकेत गोळीबार, चार महिलांसह ८ जण ठार 

0
26

अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात गोळीबाराची घटना घडली आहे. अंटलांटामधील तीन स्पा सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात चार महिलांसह आठ जण ठार झाले. स्थानिक पोलीस आणि माध्यमांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.अटलांटामधील पिडमॉन्ट मार्गावर गोल्ड मसाज स्पा सेंटरवर दरोडा पडला असल्याची माहिती स्थानिक वेळेनुसार, सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांना तीन मृतदेह आढळले. पोलीस गोल्ड मसाद स्पामध्ये असताना आणखी एरोम थेरेपी स्पामध्ये गोळीबार झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.