केंद्रीय मंत्री आठवलेंनी सलग चौथ्या वर्षी बिबट्या घेतला दत्तक

0
37

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी यंदाही बिबट्या दत्तक घेण्याचा वारसा कायम ठेवला आहे. गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय मंत्री मुंबईतल्या बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बिबट्या दत्तक घेत आहेत. याही वर्षी त्यांनी आपला दत्तक वारसा कायम ठेवत दोन बिबटे दत्तक घेतले. गेल्या वर्षी त्यांनी भीम नावाचा बिबट्या दत्तक घेतला होता. मात्र त्याचे आकस्मित निधन झाले. त्यामुळे त्यांनी यंदा दोन बिबटे दत्तक घेतले असून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.