रायगडावरील आकर्षक रोषणाई पाहिली का?

0
194

शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जयंती आहे. यानिमित्त रायगड किल्ला पूर्वसंध्येला नेत्रदीपक विद्युत रोषणाईने उजाळून निघाला. अनेक दिवस अंधारात असणार्‍या वास्तू प्रकाशमान झाल्या. राजसदरसह रायगडवरील विविध वास्तूंना रंगीबेरंगी रोषणाईने वेगळी झळाळी मिळाली.
खा. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी रायगडवरील महत्त्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधून, रायगडवर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली होती. यावेळी यादव यांनी सांगितलेल्या समस्यांनंतर श्रीकांत शिंदेंनी आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर मागणीवर पुरातत्त्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. आकर्षक रोषणाईमुळे रायगडाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.