औरंगाबादच्या महिलेची १८ वर्षांनंतर पाकिस्तानी तुरुंगातून सुटका,१५ दिवसातच वृद्धापकाळाने मृत्यू

0
29

अठरा वर्षे पाकिस्तानच्या (Pakistan) जेलमध्ये असलेल्या एका 65 वर्षीय महिलेची पाकिस्तानच्या जेलमधून सुटका झाली होती .हसीना बेगम असे यांचे नाव असून मायदेशी (india) परतल्याच्या काही दिवसातच त्यांचे निधन झाले.त्या औरंगाबाद येथील रहिवासी होत्या. 2002मध्ये ही महिला पाकिस्तानमध्ये आपल्या नातेवाईकांना भेटायला गेल्या होत्या. मात्र पाकिस्तानमध्ये पोहोचल्यावर त्यांचा पासपोर्ट हरवला. पोलिसांना त्या संशयास्पद वाटल्या त्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या जेलमध्ये 18 वर्ष काढावे लागले. त्यांच्या सुटकेसाठी औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेत इतर कागदपत्रे व इतर रहिवासी पुरावे परराष्ट्र मंत्रालयास सादर केले. त्यामुळे त्यांची पाकिस्तान सरकारने तुरुंगातून सुटका झाली. डिसेंबर महिन्यात अमृतसर येथे आल्याच्या 15 दिवसांतच त्यांचे वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

  • एका 65 वर्षीय महिलेची पाकिस्तानच्या जेलमधून 18 वर्षांनी सुटका
  • सुटकेच्या 15 दिवसांनी महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू
  • पासपोर्ट हरवल्याने महिलेने पाकिस्तानच्या जेलमध्ये घालवले 18 वर्ष