ईडीविरोधात अविनाश भोसले यांची हायकोर्टात धाव

0
27

ईडीची नोटीस आल्यानंतर पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. जमिन गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. ईडीच्या चौकशीविरोधात पिता-पुत्राने कोर्टात धाव घेतली होती.
ईडीने समन्स बजवाण्यापूर्वी आणि कार्यालयावर धाड टाकण्यापूर्वी कोणतेच कारण दिले नसल्याचे त्यांनी याचिकेत नमूद केले आहे. ईडी मनमानी पद्धतीने कारवाई केल्याचे सांगत सुनावणी होईपर्यंत कठोर कारवाई करू नये अशी विनंती त्यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. मात्र शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने चौकशी थांबवण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला होणार आहे.