पराभवानंतर बबिता फोगाट च्या बहिणीची आत्महत्या

0
22

कुष्तीचा अंतिम सामना हरल्यानंतर भारतीय महिला कुस्तीपटू रितिका ने आत्महत्या केली आहे. रितिका ही बबिता फोगट हिची मामे बहीण होती. रितिकाने सोमवारी रात्री आपल्या गावी बलाली मध्ये गळफास लावून आत्महत्या केली. रितिका ने 12 ते 14 मार्च  दरम्यान राजस्थानच्या लोहगड स्टेडियम मध्ये झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर,ज्युनिअर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतले होते. 14 मार्च रोजी अंतिम सामना खेळण्यात आला, या मध्ये रितिका एक अंकाने पराभूत झाली. पराभूत झाल्यावर तिला या गोष्टीचा हादरा बसला आणि तिने राहत्या घरात स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.या पूर्वी तिने सुमारे 4 वेळा राज्य स्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता.