अनुष्काच्या कडेवर बेबी वामिका, विराट कोहली ने Women’s day वर शेअर केली खास पोस्ट

0
33

क्रिकेटर विराट कोहली अन अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी क्युट कपल म्हणून फेमस आहेत.दोघेही सोशल  कपल गोल्स देण्यात नेहेमीच अग्रेसर असतात.आज महिला दिनानिमित्त विराटने पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिका साठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे.या पोस्टमध्ये विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माचे वर्णन सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक असल्याचे केले आहे. तसेच मुलगी वामिका मोठी झाल्यावर तिच्यासारखी होईल अशी चर्चा आहे. विराट कोहलीने अनुष्का आणि मुलगी वामिकाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.त्यात तो म्हणाला ‘एखाद्या मुलाचा जन्म पाहणे फारच धक्कादायक आहे, एक अविश्वसनीय आणि मनुष्याचा अद्भुत असा उत्तम अनुभव आहे. हे पाहिल्यानंतर, आपल्याला महिलांचे खरे सामर्थ्य आणि देवत्व जाणून घेता येईल आणि त्याचप्रमाणे देवाने त्यांच्यामध्ये जीवन का निर्माण केले ते समजून घ्या. कारण ते आपल्यापेक्षा कितीतरी पटीने शक्तिशाली आहेत. ”