ठाण्याचे माजी महापौर अनंत तरे यांचे निधन 

0
224

ठाण्याचे माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते तसेच शिवसेनेचे उपनेते अनंत तरे यांचे निधन. त्यांनी आज ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.ते ६६ वर्षांचे होते. अनंत तरे यांची प्रकृती मागील दोन महिन्यांपासून खराब होती तसेच त्यांच्यावर उपचार सुरू होते.मात्र, सतत त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मेंदूतील रक्तस्त्रावामुळे अनंत तरे यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यातच त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे गुंतागुंत वाढत गेली आणि आज सायंकाळी पावणेपाच वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.