भंडारा जळीतकांडप्रकरणी दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल

0
28

भंडारा जिल्ह्यात 9 जानेवारीला जिल्हा रुग्णालयात 10 नवजात बाळकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. आता जवळपास दीड महिन्यानंतर दोन परिचारिकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 10 नवजात बालकांच्या मृत्यूसाठी हलगर्जीपणा आणि दुर्लक्ष केल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे.

अतिदक्षता विभागात पहाटे अडीच वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. यात कक्षात भरती असलेल्या 17 बालकांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला होता. तर 7 बालकांना वाचवण्यात यश आले होते.