जीएसटी नियामवली आणि इंधन दरवाढीविरोधात भारत बंद!

0
31

कन्फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने जीएसटी संदर्भात समीक्षा करण्यासाठी आज भारत बंदचं आवाहन केले आहे. जीएसटीमधील तर्कहीन तरतुदी तसेच ई कॉमर्स कंपन्यांवर प्रतिबंध लावा या मागण्यांसाठी बंद पुकारण्यात आला आहे. देशातील 1500 ठिकाणांवर धरणं आंदोलन केले जाणार आहे. या बंदला संयुक्त किसान मोर्चा आणि ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशने समर्थन दिले आहे. सीएसआयटी वाढते इंधन दर आणि ई-वे बिल संदर्भात चक्का जाम आंदोलन करणार आहेत.

भारत बंदमध्ये लाखो व्यापारी व दुकानदार सहभागी होणार आहेत. या बंदमुळे किराणा व्यापार, माल वाहतूक, मसाले बाजार, भांडी बाजार, मोबाइल व संगणक विक्री या सर्व क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. मुंबईतील अनेक व्यापारी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला आहे.