ऐतिहासिक वास्तू भिडेवाड्याचे स्मारकात होणार रुपांतर

0
44

पुण्यातील महात्मा जोतिबा फुले अन सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती हा ऐतिहासिक वास्तू असणारा भिडेवाड्याचे संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्याने सांस्कृतिक कार्य विभागाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचे गठन करावयांच्या सूचना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. यासंदर्भातील बैठक आज (11 फेब्रुवारी) रोजी मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.ज्यामध्ये भिडेवाड्याचे स्मारकामध्ये रुपांतर होण्याचा निर्णय घेण्यात आला.