भिवंडीत शेतकऱ्याने घेतले तब्बल 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर, जाणून घ्या कारण

0
211

सर्वीकडे सध्या शेतकरी आंदोलनाच्या चर्चा सुरु असतानाच भिवंडीतून एका शेतकऱ्याबद्दल सकारात्मक बातमी मिळत आहे. शेतकरी आणि उद्योजक असलेले जनार्दन भोईर यांनी 30 कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे. बांधकाम व्यावसायिकसुद्धा असलेल्या जनार्दन भोईर यांनी अलीकडेच दुग्ध व्यवसायात प्रवेश केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दूध विकता यावे यासाठी त्यांनी हे हेलिकॉप्टर विकत घेतले आहे.