मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

0
46

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एकापाठोपाठ मंत्रिमंडळातील मंत्रीही कोरोनाच्या कवेत येत आहेत. आता महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची बाधा झाली आहे. छगन भुजबळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोना फैलाव वेगाने होत असताना रविवारी साहित्य संमेलनाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक भुजबळांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर आमदार सरोज अहिरे यांच्या लग्नातही भुजबळांनी हजेरी लावली होती. या लग्नात शरद पवार आणि अजित पवार यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे भुजबळांच्या संपर्कात आलेल्या अनेकांची चिंता वाढली. खबरदारी म्हणून शरद पावर यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.