राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा चीनच्या जिनपिंग यांच्याशी संपर्क

0
33

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर जो बायडेन यांनी पहिल्यांदाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या संपर्क साधला. बायडेन यांनी चीनी लूनर न्यू ईयरनिमित्त शुभेच्छा दिल्या. चीनमध्ये नव्या वर्षाची सुरुवात चंद्रावर आधारीत कॅलेंडरनुसार होते. लूनर न्यू ईयरचा उत्सव 15 दिवसापर्यंत असतो आणि लालटेन महोत्सवाने त्याची सांगता होते.

बायडेन-जिनपिंग संवादात हाँगकाँग आणि शिनजियांग भागाचा उल्लेख झाला. या भागात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याने अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. व्हाईट हाऊसकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यावरही जोर देण्यात आला.