दिल्ली सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ राज्यातील नागरिकांना प्रवेशासाठी कोरोना अहवालची सक्ती

0
46

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रासह पाच राज्यांतून सार्वजनिक वाहतूकीच्या माध्यमातून दिल्लीत येणाऱ्या लोकांना आता त्यांचा कोरोना निगेटिव्ह असलेला अहवाल सादर करावा लागणार आहे.
महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि पंजाब या पाच राज्यातून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना आता त्यांची RT-PCR चाचणी सादर करावी लागणार आहे. या अहवालाशिवाय संबंधित पाच राज्यांच्या नागरिकांना दिल्लीत प्रवेश करता येणार नाही.दिल्ली सरकारचा हा निर्णय फ्लाइट, ट्रेन आणि बसच्या माध्यमातून प्रवास करणाऱ्यांसाठी लागू होणार आहे.