मोठी बातमी! मुंबईत अंशत: लॉकडाऊनचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे संकेत

0
28

मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मुंबईकरांना लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. आणखी आठ-दहा दिवस कोरोना संकटामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊ आणि तरीही परिस्थिती सावरली नाही तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन लागू करावे लागेल, असा इशारा अस्लम शेख यांनी दिला.
मुंबई मनपाच्या हद्दीत ७ मार्चच्या संध्याकाळपर्यंत ९ हजार ३१९ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली असून कोरोना रुग्ण आणि कोरोना प्रतिबंधक लसचा कार्यक्रम अशी दोन्ही आव्हाने एकाचवेळी सांभाळताना आरोग्य विभागाची तारांबळ उडाली आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसले तर आठ-दहा दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन अंशत: लॉकडाऊन करण्याचा इशारा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला. तसेच ते म्हणाले आता लाॅकडाऊन नको असेल तर लोकांनी नियमांचे पालन करायला हवे. स्वतःची, घरच्यांची, समाजाची काळजी घ्यायला हवी.