पालिका अतिरिक्त आयुक्तांचे मोठे विधान,मुंबईत लग्नकार्यामुळे वाढला कोरोना 

0
30

मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम अन लग्न समारंभातून कोरोना वाढल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सध्यातरी मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा विषय अजेंड्यावर नसल्याचे ते म्हणाले. सुरेश काकाणी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. सध्या मुंबईत 82 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. फक्त 18 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत, असं काकाणी यांनी सांगितलं.