ठाणे: राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये घडली. या महिला अत्याचाराच्या घटनेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ कारवाई केली आहे. त्यांनी भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे याला अटक केली आहे.
ठाणे मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना महिलेवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तेलवणे यांनी बुधवारी रात्री १२:४० वाजता एक महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेलवणे यांच्यावर पोलिसांनी कारवाई करुन त्यांना अटक केली आहे. तेलवणे यांच्यावर सेक्शन ४५२,३५४,३५४A आणि ५०६ या आयपीसी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.