राहुल गांधींच्या टिप्पणीवर बीजेपी आक्रमक, म्हणाले ‘मासेमाऱ्यांसाठी असावे स्वतंत्र मंत्रालय’

0
32

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सध्या केरळ दौर्‍यावर आहेत. यावर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी राहुल गांधी वेगवेगळ्या क्षेत्रांचा दौरा करत आहेत. बुधवारी राहुल गांधींचे एक वेगळे चित्र दिसुन आले.केरळच्या कोल्लममध्ये राहुल गांधी मासेमारांसह समुद्रात गेले अन त्यांच्यासोबत मासेमारी करताना दिसले. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी येथील मासेमारांशीही चर्चा केली व नंतर त्यांच्याबरोबर नावेत बसून समुद्रात मासेमारी सुद्धा केली.
कोल्लम येथे मच्छीमारांशी बोलतांना राहुल गांधी म्हणाले, ज्या पद्धतीने शेतकरी शेतात काम करतात त्याच पद्धतीने मासेमार समुद्रात काम करतात .केंद्र सरकारमध्ये शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, परंतु मासेमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही’. मात्र त्यांच्या या वक्तव्याला केंद्र सरकारने लक्ष्य केले आहे. तसेच राहुल म्हणाले ज्यावेळी ते RSS वर प्रश्न उपस्थित करतात त्यांना लक्ष केलं जातं.