वीज ग्राहकांच्या मागण्यांसाठी भाजपा करणार जेलभरो आंदोलन

0
65

लॉकडाऊन काळात आलेल्या भरमसाठ वीज बिलांमुळे सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या सर्व सामान्यांसाठी भाजपाने जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. 100 युनिटपर्यंत वीज मोफत द्या, लॉकडाऊन काळातील अवाजवी बिले दुरुस्त करून द्या अशा मागण्या आंदोलनातून मांडण्यात येणार आहेत. महाआघाडी सरकारने मागण्या मान्य न केल्यास 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपा प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माध्यम विभाग प्रभारी माधव भांडारी, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक हे उपस्थित होते.