भाजपा नेत्याचे ‘त्या’ गाडीसोबत संबंध, सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

0
34

मुंबईतील सध्या चर्चेत असलेले मनसुख हिरेन या हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.  सचिन वाझे यांच्याकडून एनआयएच्या टीमने गाडी जप्त केलीये. परंतु काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्याचे या गाडीसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सचिन सावंत यांनी ट्वीट करून या गाडीसोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा केला आहे.

या कारसोबत ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी देवेन हेमंत शेळके यांचे फोटो आहे. त्यामुळे याबद्दल भाजप नेत्यांनी खुलासा करावा, अशी मागणीही सचिन सावंत यांनी केली.