नरेंद्र मोदी स्टेडियम नावावरून सुब्रमण्यन स्वामींचा ट्विटरवरून हल्लाबोल

0
32

अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाला घरचा आहेर देण्याऱ्या सुब्रमण्यन स्वामी यांनीही ट्विटद्वारे खडे बोल सुनावले आहेत. ‘मोदी स्टेडियमचं जुनं नाव हे मोटेरा स्टेडियम होतं, तर ते खोटं बोलत आहेत. यापूर्वी सरदार पटेल हे नाव नव्हतं का?’ असा सुब्रमण्यन स्वामी यांनी ट्विट करत भाजपाला खडे बोल सुनावले आहेत.

गुजरात सरकारने नामकरणानंतर आपली बाजू मांडली आहे. सरदार पटेल यांच्या नावाने स्पोर्ट्स एन्क्लेव तयार होत आहे. त्यात या स्टेडियमचा समावेश असेल. स्पोर्ट्स एन्क्लेवमध्ये फुटबॉल, हॉकीसह सर्व खेळांची व्यवस्था केली जाणार आहे.

सुब्रमण्यन स्वामी गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प आणि शेतकरी आंदोलनातही त्यांनी सरकारविरोधी मत मांडलं होते.