भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक, पंतप्रधान मोदी करणार संबोधन

0
41

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि कृषी कायद्यांवरुन सुरु असलेल्या राजकारणावरुन भाजपाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे. भाजपाचे राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत या दोन बाबींवर विशेष चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सर्व राज्यातील राजकीय घडामोडींचा अहवाल ठेवला जाईल. तसेच शेतकरी आंदोलनाबद्दल माहिती दिली जाणार आहे. खासकरुन दिल्ली जवळ असलेल्या उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि राजस्थानवर या बैठकीत मंथन होणार आहे. शेतकऱ्यांसमोर कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी रणनिती आखली जाईल.