‘आमचे हिंदुत्व कायम आहेच’, असं म्हणणा-या शिवसेनेला भाजपाने डिवचले

0
47

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. बुधवारी झालेल्या विधानसभेतील राज्यपालांच्या अभिभाषणानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जुगलबंदी जुंपली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि  सुधीर मुनगंटीवार या भाजपच्या नेत्यांनी सताधारी पक्षावर चांगलीच टीका केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही  शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नका, हिंदुत्व शिकवण्याची तुमची पात्रता नाही’ अशा शब्दात प्रतिउत्तर दिले. मात्र आता या मुद्य्यावरून भाजपाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “हिंदुत्व कायम आहेच असं भाषणात सांगतात, मात्र ती  निभावण्याची वेळ आली की, राम मंदिर समर्पण निधीवर टीका करतात”. अशा प्रकारे भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत शिवसेनेला टोला लगावला आहे.

तसेच, “शिवसेना संभाजीनगर नामकरणाच्या केवळ गप्पा मारतेय. कारण औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध आहे. हिंदू सडा हुवा है म्हणणाऱ्या शरजिला राज्यात मोकळे रान दिले जाते. मात्र शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, अशी टीका देखील केशव उपाध्ये यांनी केली आहे.