…तर मग राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागणार

0
31

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता, कोरोना व्हायरसला अटकाव करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन लादला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया बीएमसीचे एएमसी सुरेश काकाणी यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, लोकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोर पालन केले पाहिजे आणि प्रत्येकाने मास्क परिधान करावा, असं आवाहन सुरेश काकाणी यांनी केलं आहे.