लाचखोरी प्रकरणात बीएमसीच्या एका अधिकाऱ्याला अटक

0
50

दहा हजार रुपयांची लाच मागितल्याचा आणि स्वीकारल्याच्या आरोपाखाली बीएमसीच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केली. धारावी येथील एका गृहनिर्माण संस्थेची दुरुस्ती करण्यासाठी लाच मागितल्यानंतर एसीबीने भ्रष्टाचार रोखण्याच्या कायद्याखाली संभाजी देवकाते, सहाय्यक अधिकाऱ्यास अटक केली.