बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतची आता या प्रकरणात उडी

0
50

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप  यांच्या घरावर तसेच कार्यालयावर देखील इन्कम टॅक्स विभागाने धाड टाकली आहे. आतापर्यंत त्यांच्या आर्थिक व्यवहारात कोट्यवधींची अनियमितता आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आता अभिनेत्री कंगना रणौत हिने देखील नेहमी प्रमाणे उडी घेतलीये. 

कंगना रणौतनं तिच्या ट्वीटच्या अकाऊंटवर एक पोस्ट टाकली आहे, त्यामध्ये, “आयकर विभागाने दावा केला आहे की, त्यांनी फोनमधील सर्व डेटा क्लियर केला आहे. मनी लाँड्रिंग आणि त्यातील हिस्सा असलेल्या भागीदारीचा आकडा आश्चर्यकारक असून शकतो,” असं त्यावर तिनं लिहिलं आहे. त्यावर कंगना म्हणाली आहे कि, “मला अगोदरपासून त्यांच्यावर संशय आला होता जेव्हा महागड्या राष्ट्रविरोधी जाहिरातींमधून त्यांना प्रवासी मजुरांना चिथावणी देताना पाहिलं होतं,”डेटा परत मिळवला जाऊ शकतो. परंतु हे सर्व छोटे खेळाडू आहेत.” सरकारला सर्वांसाठीच एक चांगलं उदाहरण सादर करावं लागेल. ते दहशतवादासाठी देशाचे तुकडे करून विकू शकत नाहीत, जय हिंद,” असेही कंगना म्हणाली.