पश्चिम बंगालमध्ये १५ ठिकाणी बॉम्बहल्ला, तीन जण जखमी

0
41

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये सतत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. पश्चिम बंगालमधील नॉर्थ २४ परगना या जिल्ह्यात बॉम्बहल्ला झाल्याचे समोर आले. या हल्ल्यात एकूण तीनजण जखमी झाले आहेत, तसेच यात एका लहान मुलाचाही समावेश आहे.

हा हल्ला एकूण १५ ठिकाणी केला असून भाजपा खासदार अर्जुन सिंग यांच्या घराजवळच्या परिसरात करण्यात आला आहे. तसेच कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून हल्लेखोरांनी ठिकठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचीही तोडफोड केली, अशी माहिती मिळते. याविषयी आम्ही निवडणूक आयोगाला संपर्क करू, असे पश्चिम बंगालचे भाजपा नेते मुकूल रॉय यांनी म्हटले आहे.