वसई-विरारमध्ये बविआला धक्का, पंकज देशमुख यांनी हाती बांधलं शिवबंधन

0
59

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे. बहुजन विकास आघाडीचे पंकज देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंकज देशमुख यांना शिवबंधन बांधलं. पंकज देशमुख यांच्यासोबतच अॅड. कल्याणी पाटील, आदिवासी एकता परिषदेचे दत्ता सांबरे, प्रकाश जाधव, वंदना जाधव आणि जनआंदोलन समितीचे गॉडसन रॉड्रिक्स यांनीही शिवबंधन हाती बांधलं आहे. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावरच हा बविआसाठी मोठा धक्का आहे.