वर्णद्वेषी टिप्पणीवरुन कर्णधार विराट कोहली भडकला! ;म्हणाला ‘ वर्णद्वेषी टिप्पणी अजिबात मान्य करणार नाही’

0
2

सिडनी येथे सुरु असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरुन विराट कोहलीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

  • सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय संघातील खेळाडूंवर केलेल्या वांशिक टीका झाली
  • याबाबद कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे
  • त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या तिसर्‍या कसोटीत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वांशिक भाष्य केलं होतं
  • कोहलीने ट्विट केले की, “वर्णद्वेषी टिप्पणी अजिबात मान्य नाही’
  • ‘सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना अशा अनेक अनुभवानंतर मी असे म्हणू शकतो की ते सहनशीलतेच्या बाहेर आहे. मैदानावर हे पाहणे फार वाईट आहे.”
  • ‘या घटनेचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे’
  • ‘जेणेकरून पुढे अशा घटना होणार नाहीत’