CBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना दिली क्लीन चीट – सूत्र

0
41

CBI ने आपले माजी स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांना क्लीन चीट दिली आहे. त्यांच्यावर फसवणूकीच्या केसमध्ये अडकलेल्या फार्मा कंपनी स्टर्लिंग बायोटेककडून लाच घेण्याचा आरोप होता. सूत्रांनी याबाबतची बातमी दिली असून राकेश अस्थाना यांना एजेंसीकडून मिळालेली ही दुसरी क्लीन चीट आहे. वादात अडकलेले राकेश अस्थाना यांना 2018मध्ये पदावरून हटवण्यात आलं होतं. सध्या ते बीएसएफचे प्रमुख आहेत. याआधी राकेश अस्थाना यांना मीट निर्यातक मोईन कुरैशी संबंधित लाचखोरी प्रकरणातही क्लीन चीट देण्यात आली होती.