कोळसा घोटाळा प्रकरणात सीएम ममता बॅनर्जीच्या पुतण्याच्या घरी पोहोचली सीबीआई टीम

0
52

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची पत्नी रुजीरा बॅनर्जी यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने रविवारी कोळसा तस्करीच्या आरोपाशी संबंधित एका प्रकरणाच्या चौकशीत सहभागी होण्यास सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयची तीन सदस्यांची टीम कोलकाता येथे अभिषेख बॅनर्जी यांच्या घरी पोहोचली असून आज त्यांना समन्स बजावले. समनमध्ये असे लिहिले आहे की त्यांना चोवीस तासात सीबीआयच्या कार्यालयात हजर व्हावे लागेल.
कोळसा तस्करी प्रकरणात त्यांच्या पत्नीला नोटीस देण्यासाठी सीबीआय अधिकारी टीएमसी खासदाराच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. राज्यात काही महिन्यांनंतर निवडणुका होणार आहेत अशा वेळी सीबीआय बॅनर्जी यांच्या घरी पोहोचली आहे.यामुळे अनेक तर्क वितर्क लावल्या जात आहेत.