केंद्र सरकारचा ‘इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स’ जाहीर

0
37

भारतामध्ये राहण्यासाठी आता सर्वोत्कृष्ट शहर म्हणून बंगळूरूची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी केंद्र सरकारच्या ‘इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स’ मध्ये असे सांगण्यात आले आहे. या यादीमध्ये पुणे, अहमदाबाद, चेन्नई, सुरत, नवीमुंबई, कोईम्बतूर, वडोदरा, इंदोर आणि मुंबई असा देण्यात आला आहे.

हा अहवाल केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाकडून जाहीर केला जातो. दहा लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये शिमला या शहराने अव्वल क्रमांक पटकवला असून या कॅटेगरीमध्ये भूवनेश्वर या शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर अनुक्रमे सिल्व्हासा, काकिनाडा, सेलम, वेल्लोर, गांधीनंगर, गुरुग्राम या शहरांचा क्रमांक लागतोय. मुझफ्फरपूर या शहराचा शेवटचा क्रमांक लागतोय.


दहा लाखांच्या वरती लोकसंख्या असलेल्या 49 शहराची यादी  या केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘इज ऑफ लिव्हिंग इन्डेक्स’ च्या अहवालात देण्यात आली आहे.