कोरोना रोखण्यासाठी दहा राज्यात केंद्रीय टीम दाखल

0
22

देशात कोरोना फैलाव रोखण्यासाठी केंद्राकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. दहा राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्राची उच्च स्तरीय समिती पोहोचली आहे. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडु, पश्चिम बंगाल आणि जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. या समितीत तज्ज्ञांसोबत मेडिकल अधिकारी असून एका आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे. काही राज्यांमध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याचंही पुढे आले आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव गतीने होत असल्याचं समोर आले आहे. त्यासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या दहा राज्यांव्यतिरिक्त पश्चिम बंगालमधील स्थितीवरही नजर असणार आहे.