UPSC उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास केंद्र सरकार तयार 

0
44

युपीएससीकडून (UPSC)घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला कोरोनामुळे मुकलेल्या परीक्षार्थीं वयाच्या अटीमुळे पुन्हा संधी मिळू शकत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात त्यांना एक संधी देण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेद्वारे परीक्षार्थींना पुन्हा एक संधी देण्यासंदर्भात युपीएससी आयोगाला निर्देश देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. ए.एम. खानविलकर यांच्या खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. केंद्र सरकारने त्यावर न्यायालयात भूमिका मांडली. नागरी सेवा परीक्षेसाठी जास्तीची एक संधी उमेदवारांना दिली जाईल. ही संधी नागरी सेवा परीक्षा २०२१ साठी असेल. नागरी सेवा परीक्षा -२०२० मध्ये जे उमेदवार उपस्थित होते, त्यांनाच संधी उपलब्ध करून देता येऊ शकेल, असे सरकारने न्यायालयात म्हटले आहे.

  • कोरोनामुळे परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा
  • केंद्र सरकारने त्यावर न्यायालयात मांडली भुमिका
  • केंद्र सरकार UPSC उमेदवारांना आणखी एक संधी देण्यास तयार