केंद्र सरकारची मोठी घोषणा, १ मार्चपासून ६० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना मिळणार लस

0
44

कोरोनाच्या संदर्भात केंद्र सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनुसार 1 मार्चपासून 60 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या 10 करोड पेक्षा जास्त नागरिकांमध्ये लसीकरण मोहीमेला सुरवात केली जाईल. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले ‘ही लस 10 हजार सरकारी केंद्रांवर तसेच 20 हजाराहून अधिक खासगी रुग्णालयात दिली जाईल.’
16 जानेवारीपासून देशात लसीकरण सुरू झाले आहे यामध्ये भारत सरकारने कोवँक्सिन अन कोविशिल्ड या दोन कोरोना लसींना मान्यता दिली आहे.तसेच लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रंट लाईन वर काम करणाऱ्या डॉक्टर्स ,नर्स, सैनिकांना लस दिली गेली.आरोग्य मंत्रालयानुसार आतापर्यंत 1,19,07,392 लस डोस देण्यात आले आहेत.