सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचना ,वाचा … 

0
33

केंद्रीय आयटी व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद अन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषद झाली. यावेळी रविशंकर प्रसाद यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकत सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
सोशल मीडिया कंपनी भारतात व्यवसाय करू शकते. पण त्याचा गैरवापर होता कामा नये असे म्हणत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. सोशल मीडियावरुन अनेक वेळा चुकीची माहिती पसरवली जाते. यामुळे सुसंस्कृत समाजात तेढ निर्माण होत आहेत. अशा तक्रारीही समोर आल्या आहेत.सोशल मीडिया वापरकर्त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्लॅटफॉर्म असावा. द्वेष पसरवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे असे म्हणत त्यांनी काही सूचना दिल्या आहेत.

  • कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट 24 तासात काढली गेली पाहिजे
  • मुख्य तक्रार अधिकारी नियुक्त करणं आवश्यक आहे
  • पोस्ट शेअर करणाऱ्याची सगळी माहिती असली पाहिजे
  • एका नोडल अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात येईल नवीन सोशल मीडिया नियम तीन महिन्यांत लागू केले जातील