चंद्रकांत पाटलांनी ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्य सरकारला विचारले प्रश्न

0
40

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाची राज्य सरकारने स्वत:हून चौकशी केली पाहिजे अशी मागणी केली असून या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही असे म्हणाले.पूजाच्या नातेवाईकांनी पोलिसात याबाबद तक्रार द्यायला हवी असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला असून राज्यात कायदा संपत चालला आहे का अशी टीका सुद्धा राज्य सरकारवर केली आहे.