चंद्रयान-3चे 2022 साली प्रक्षेपण, इस्रो प्रमुखांची माहिती

0
59

चंद्रयान-3 चे पुढच्या वर्षी प्रक्षेपण होणार असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख सिवन यांनी माहिती दिली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चंद्रयान 3 आणि गगनयान मिशन लांबणीवर पडले. ‘चंद्रयान 3 मिशन हे चंद्रयान 2 सारखंच असेल, मात्र यात ऑर्बिटर नसेल. चंद्रयान 2 मधील ऑर्बिटरचा उपयोग हा चंद्रयान 3 मध्ये केला जाणार आहे. यावर काम सुरु आहे आणि 2022पर्यंत हे काम पूर्ण होईल’ असं इस्रो प्रमुख सिवन यांनी सांगितले.

चंद्रयान 2चं आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथून 22 जुलै 2019 रोजी प्रक्षेपण करण्यात आले होते. 7 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर चंद्रावर उतरले. मात्र चंद्र तळावर जोराने धडकल्याने त्याच संपर्क होऊ शकला नाही.