मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवनेरीवर

0
50

शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज किल्ले शिवनेरीवर जाऊन शिवजन्म स्थळाचे दर्शन घेतले. किल्ले शिवनेरीवरील राजमाता जिजाऊ मासाहेब आणि बालशिवबांच्या शिल्पाला वंदन करुन विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यातील जनतेला, समस्त शिवभक्ताना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

“सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

“युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. छत्रपती शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या शौर्याची, त्यागाची जयंती आहे,” असे अजित पवार म्हणाले.