कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक 

0
48

मुंबई: गेल्या काही महिन्यामध्ये राज्यात कोरोनाचा घसरता आलेख दिसून येत होता मात्र आता पुन्हा एकदा या रोगाने वेगाने पसरण्यास सुरवात केली आहे. अनेक जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाला पुन्हा ताकदीने आणि जबाबदारीने कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.मात्र याबाबद अधिक चर्चा महत्वाची असल्याने आज मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त व अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री हे महापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईतील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
आजच्या बैठकीनंतर मुंबईबद्दल नेमका काय निर्णय घेतला जाणार याबद्दलही उत्सुकता आहे. तसेच जनतेने नियम न पाळल्यास पुन्हा लॉकडाऊन करावे लागणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी आधीच दिला आहे. आजची बैठक त्या दृष्टीने खुप महत्त्वाची मानली जात आहे.