मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस

0
48

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच कोरोना लस घेतली आहे. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात जाऊन त्यांनी लस घेतल्याची माहिती मिळते. यावेळेस त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्याचदरम्यान रश्मी ठाकरेंच्या आई आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी देखील कोरोनाची लस घेतलीये.